साउथमधील सुपरस्टार यशच्या आगामी “केजीएफ चॅप्टर-2′ या चित्रपटाची रिलीज डेट निर्मात्यांनी नुकतीच जाहीर केली आहे. या चित्रपटाची प्रेक्षकांना खूपच उत्सुकता असून तो 23 ऑक्टोबर 2020ला चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात येणार आहे.
यावेळी चित्रपटाचे एक इंट्रेस्टिंग पोस्टरही जारी करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये अभिनेता यशच्या उजव्या हातात गन दिसत आहे आणि ब्लॅकग्राउंड ब्लड-रेड आहे. या पोस्टरवर “मे आई कम इन…’ असेही लिहिण्यात आले आहे.
दरम्यान, यापूर्वी प्रदर्शित झालेल्या “केजीएफ चॅप्टर-1’ला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमावित प्रेक्षकांचीही मने जिंकली होती. तेव्हापासूनच चाहत्यांना दुस-या भागाची उत्सुकता निर्माण झाली होती.
“केजीएफ-2′ हा चित्रपट कन्नड, तुलुगू, तमिल, मलायालम आणि हिंदी या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या ऍक्शन थ्रिलर चित्रपटाचे डायरेक्शन प्रशांत नील यांनी केले आहे.
या चित्रपटात यशशिवाय श्रीनिधि शेट्टी, संजय दत्त, रवीना टंडन यासारखे दिग्गज कलाकर काम करत आहे. यात संजय दत्त मुख्य खलनायकाची भूमिका साकारत आहे.