तांबवे – विरोधक पैसाचा वापर सत्ता घेण्यासाठी करत असून कराड उत्तर व दक्षिणची टोळी एकत्र येऊन ही संस्था लाटण्याचा प्रयत्न करत आहे. चाळीस वर्षे ही संस्था कांकानी चांगली चालवली असून ती उदयसिंह पाटील येथून पुढेही सक्षमपणे चालवतील. विरोधकांच्या अमिषाला, भुलथापांना बळी न पडता त्यांना योग्य जागा दाखवा, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
वसंतगड, ता. कराड येथे रयत पॅनेलचा तांबवे-सुपने जि. प. गटाच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी सभापती आर. वाय. नलवडे होते. यावेळी ऍड. उदयसिंह पाटील, मनोहर शिंदे, अजित पाटील-चिखलीकर, विजय कदम, अशोक पाटील-पोतलेकर, तुकाराम डुबल, प्रकाश पाटील, पै. सचिन मोहिते, हणमंतराव चव्हाण, जगदिश पाटील, शरद चव्हाण, प्रदिप पाटील उपस्थित होते.
ऍड. उदयसिंह पाटील म्हणाले, बाजार समितीची जडणघडण करण्यामध्ये काकांचे मोठे आहे. आज विरोधकांना सत्ता केंद्रीत करून सक्षम चाललेली संस्था गिळंकृत करू पाहत आहे. माणसांचे मत पैशाने विकत घेत आहेत. सत्तेसाठी खालच्या पातळीवर विरोध जात असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक प्रदिप पाटील, सूत्रसंचलन उपसरपंच विश्वासराव कणसे यांनी केले. लक्ष्मण देसाई यांनी आभार मानले.