Stock market : शेअर निर्देशांक नव्या उच्चांकी पातळीवर

सार्वजनिक क्षेत्रातील बॅंका तेजीत

मुंबई – निर्देशांक उच्च पातळीवर असूनही गुंतवणूकदारांचा शेअर खरेदीचा सपाटा चालूच आहे. आज बॅंकिंग क्षेत्राच्या त्यातल्या त्यात सरकारी बॅंकाच्या शेअरची खरेदी झाल्यामुळे शेअर बाजार निर्देशांक ( stock market news today ) नव्या उच्चांकी पातळीवर गेले.

बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा ( bombay stock market news ) निर्देशांक  ( sensex today ) सेन्सेक्‍स 181 अंकांनी म्हणजे 0.40 टक्‍क्‍यांनी उसळुन 45,608 अंकांवर बंद झाला. विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक ( national stock exchange ) निफ्टी  ( nse nifty ) 37 अंकांनी वाढून 13,392 अंकांवर बंद झाला.

अल्ट्राटेक सिमेंट,टिसएस, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचसीएल टेक, इन्फोसीस, कोटक बॅंक या कंपन्यांना खरेदीचा फायदा झाला. तर सन फार्मा, इंडसइंड बॅंक, एनटीपीसी, , ओएनजीसी टेक महिंद्रा, एशियन पेंट्‌स या कंपन्यांना नफेखोरीचा फटका बसला. याबाबत बोलताना रिलायन्स सिक्‍युरिटीचे विनोद मोदी यांनी सांगितले की, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून भारतीय शेअर बाजारात खरेदी चालू होत असल्यामुळे किरकोळ गुंतवणूकदारही खरेदी करीत आहेत.

अमेरिकेत लवकरच नवे पॅकेज जाहीर होण्याची शक्‍यता असल्यामुळे जागतिक शेअर बाजारातील निर्देशांक वाढत आहेत. सोमवारी परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी 3,792 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. मात्र निर्देशांक कमालीच्या उच्च पातळीवर असल्यामुळे खरेदी-विक्रीच्या लाटा येत राहण्याची शक्‍यता आहे. काही गुंतवणूकदार खरेदी करतील तर काही नफा काढून घेतील असे सांगितले जाते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.