मुंबई: राज्यातील करोनाग्रस्त रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. राज्यातील करोनाबाधितांचा आकडा चारशेच्या वर पोहोचला आहे. राज्यात आज एकाच दिवसात 81 रुग्ण वाढले आहे. मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, कल्याण डोंबिवली, अहमदनगर, बुलडाणा या शहरांमध्ये करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे करोनाबाधितांची संख्या 416वर पोहोचली आहे. तर राज्यात आतापर्यंत 17 जणांना करोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत.
दरम्यान, बुलडाण्यातही आणखी एकाचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यात करोनाग्रस्तांची संख्या 5वर गेली आहे. त्यातील एकाचा आधीच मृत्यू झालेला आहे. काल दोघांचे अहवाल निगेटिव्ह आले असून तिघांचे रिपोर्ट येणे अद्याप बाकी असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित यांनी दिली.