पुणे- ‘कोरोना विषाणू’मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषद निराधार दिव्यांग व्यक्तींच्या मदतीला धावून आली आहे. विषाणू संसर्गाच्या काळात पुणे जिल्ह्यात ‘शरद भोजन योजना’ सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवरुन याबद्दल माहिती दिली आहे.
पुणे जिल्हा परिषदेने कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर निराधार दिव्यांग व्यक्ती,गरोदर माता, दुर्धर आजार असणारे निराधार व्यक्ती व ज्येष्ठ नागरीक यांना दोन वेळेचे अन्न पुरविण्यासाठी ‘शरद भोजन योजना’ सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.(१/२) pic.twitter.com/2vIPSvy9ZU
— Supriya Sule (@supriya_sule) April 1, 2020
राज्य सरकारच्या ‘शिवभोजन थाळी’च्या धर्तीवर ही योजना असल्याचे पुणे महापालिकेने स्पष्ट केलं आहे. या योजनेमध्ये निराधार दिव्यांग व्यक्तीच्या गावातील अंगणवाडी सेविका त्यांना दररोज दोन वेळचे जेवण तयार करुन देईल.
दरम्यान, अंगणवाडी सेविकांना लाॅकडाऊनमुळे आर्थिक समस्या जाणवू लागली होती त्यामुळे दिव्यांग व्यक्तींचं पोषण आणि अंगणवाडी सेविकांचा आर्थिक प्रश्न अशा दुहेरी समस्या सुटणार आहेत