नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समर्थक पांचजन्य साप्ताहिक मासिकामधून इन्फोसिस कंपनीवर आरोप करण्यात आले आहे. आरएसएसने कॉर्पोरेट ब्रँडवर देशविरोधी शक्तींशी कनेक्शन असल्याचा आरोप करत जोरदार हल्लाबोल केला आहे.
या मासिकात कोणतीही ‘राष्ट्रविरोधी शक्ती’ याद्वारे भारताचे आर्थिक हितसंबंध दुखावण्याचा प्रयत्न करत आहे का? असा सवाल सवाल उपस्थित केला आहे. तसेच या मासिकातून इन्फोसिस नक्षलवादी, डावे यांना मदत केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच या आरोपाची शंका व्यक्त करत त्याचे पुरावे आमच्याकडे नाहीत, असंही पांचजन्यमध्ये म्हटलं आहे.
‘पांचजन्य’ या मासिकात इन्फोसिसच्या मुद्यावर ‘साख और अघात नावाची चार पानांची कव्हर स्टोरी प्रकाशित केली आहे. आणि कव्हर पेजवर त्याचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे फोटो आहे. उँची उडान, फिका पकवान, अशी टीकाही या लेखात करण्यात आली आहे.