‘मंदी’वर मात करण्याचे गुपित… (भाग-2)

जागतिक पटलावर सध्या आर्थिक मंदीचे वारे वाहू लागल्याच्या बातम्या येत आहेत. अशावेळी आपले ‘ आर्थिक नियोजन ‘ गडबडणार नाही तसेच ठरवलेली सर्व उद्दिष्टे निश्चित पूर्ण कशी होतील यासाठी आज काही महत्त्वाची पावले उचलली पाहिजेत. योग्य मार्गदर्शन व काळानुसार केलेल्या बदलाचा फायदा आपल्या आर्थिक नियोजनास मिळणार आहे.

‘मंदी’वर मात करण्याचे गुपित… (भाग-1)

गुंतवणूक करण्यासाठी कमी चढउतार होणाऱ्या फंडांची निवड करा –

बाजारातील चढ उताराचा परीणाम हा प्रत्येक गुंतवणूक योजनेवर होत असतो. जर आपल्या गुंतवणूकीमधील मूल्यामध्ये सातत्यानेबदल नको असतील तर गुंतवणूक सुरू करण्यापूर्वी आपण कमी प्रमाणात चढउतार होणाऱ्या फंडाची निवड करावी. या योजनेचा फायदा म्हणजे मुद्दलामध्ये काही काळापुरते कमी प्रमाणात नुकसान होते  व नंतर परतावा चांगला मिळतो.

उदा.
 प्रत्येक गुंतवणूकदारांने पुढील महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

– आवश्यकता नसेल तर केवळ गुंतवणूकीच्या उद्दिष्टांसाठी जमिनीमध्ये गुंतवणूक करण्याचे टाळावे, सरकारने आणलेल्या ” रेरा ” कायद्यानंतर व नोटबंदीनंतर जमिनींचे दर सातत्याने कमी होताना दिसत आहेत, तयार घरांची संख्या पुण्या – मुंबईकडे मोठ्या प्रमाणावर आहे व ग्राहकांची मागणी नाही. यामुळे येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात जागांच्या मूल्यात वाढ होण्याची शक्यता दिसत नाही.

– गुंतवणूकदाराने पुर्वी केलेली सोन्यातील गुंतवणूक सध्या अत्यंत फायदा देत आहे, परंतु बहुतेक गुंतवणुकदार दागिने स्वरुपात गुंतवणूक असल्याने या फायद्याचा लाभ घेत नाहीत. सध्या सोन्याचे दर अत्यंत चढे आहेत,  मात्रही सोन्यात गुंतवणूक वाढवण्याची योग्य वेळ नाही.

– जर काही धाडसी गुंतवणूक करावयाची असेल व जोखिम घेऊन जादाचा परतावा कमवण्यासाठी परकीय चलनातील गुंतवणूक( डॉलर) पर्यायांचा विचार करावा, या मध्ये म्युच्युअल फंडामध्ये पर्याय उपलब्ध आहेत.

आपला आपात्कालीन फंड निर्माण करा –

सध्याची बाजारातील अनिश्चितता लक्षात घेऊन पुढील ६ महिन्यांसाठीचा किमान घर खर्च व इतर खर्चासाठीची रक्कम निर्माण करा, या साठी म्युच्युअल फंडाच्या लिक्विड फंडात गुंतवणूक सुरू करा.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×