‘मंदी’वर मात करण्याचे गुपित… (भाग-1)

जागतिक पटलावर सध्या आर्थिक मंदीचे वारे वाहू लागल्याच्या बातम्या येत आहेत. अशावेळी आपले ‘ आर्थिक नियोजन ‘ गडबडणार नाही तसेच ठरवलेली सर्व उद्दिष्टे निश्चित पूर्ण कशी होतील यासाठी आज काही महत्त्वाची पावले उचलली पाहिजेत. योग्य मार्गदर्शन व काळानुसार केलेल्या बदलाचा फायदा आपल्या आर्थिक नियोजनास मिळणार आहे.

वृत्तपत्रे, दूरचित्रवाणी, सोशल मिडिया अशा माध्यमातून दररोज येणाऱ्या नकारात्मक बातम्या गुंतवणुकदारांना घाबरून व गोंधळात टाकणाऱ्या ठरत आहेत. उद्योग व्यवसायात होणारी नोकर कपात, वस्तू व सेवा मधील मागणीमध्ये निर्माण झालेला ‘अभाव’,  बाजारात असणारा रोखते अभाव, शेअर बाजारात दररोज होणारी चढउतार अशा विविध बाबी एका पाठोपाठ समोर येत असल्याने गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास गडबडला आहे. अनेक गुंतवणूकदार आपल्या आर्थिक सल्लागारांना प्रश्न विचातर आहेत की केलेली गुंतवणूक सुरू ठेवावी किंवा बंद करावी, कारण गुंतवणूक केलेल्या रकमेत गेल्या दोन वर्षांपासून कोणताही परतावा मिळाला नाही किंबहुना मूल्य कमी झाले आहे. अशावेळी सुरू असलेल्या  एसआयपी सुरू ठेवाव्यात का थांबवाव्यात?असा प्रश्न विचारला जात आहे. मागील २ वर्षांपासून एसआयपी मधील गुंतवणीचे मूल्य मूळ मुद्दलापेक्षा कमी झाले आहे. एसआयपीथांबवून सदर रक्कम बॅंकेच्या ठेवीमध्ये अथवा पीपीएफमध्ये वळवावी का? असे प्रश्र्न चिंताग्रस्त चेहऱ्याने विचारले जात आहेत.

यावर उत्तर म्हणजे सध्याच्या आर्थिक संक्रमणाच्या काळात गुंतवणूकदारांने पुढील मुद्द्यांचा निश्चितच विचार करावा…

म्युच्युअल फंड योजनेतील एसआयपी बंद करु नका –

बाजाराच्या मंदीच्या काळात एसआयपी बंद करणेहा आपला सर्वांत अयोग्य निर्णय ठरु शकतो. प्रत्येक गुंतवणूकदारांने आपल्या ठरवलेल्या “उद्दिष्टांसाठी “म्युच्युअल फंडात एसआयपीकरण्याची सुरुवात केलेली असते, केवळ मंदीच्या भीतीने एसआयपीथांबवण्याचा निर्णय तुमचे उद्दीष्ट पूर्ण करण्यापासून तुम्हांला दूर नेणारा आहे.

ज्या वेळी शेअरबाजार विविध कारणांमुळे खाली येतो त्यावेळी प्रत्येक एसआयपीखरेदीमध्ये गुंतवणूकदारांना कमी दरात जास्त युनिट मिळत असतात, या जादा युनिटचा फायदा भविष्यात ज्यावेळी शेअरबाजार वर जातो त्यावेळी एकूण गुंतवणूक मूल्य मोठ्या प्रमाणात वाढते.

‘मंदी’वर मात करण्याचे गुपित… (भाग-2)

यासाठी आपण पुढील उदाहरण पाहू.

रु.१०,००० प्रतीमहा फ्रॅंकलीन इंडिया इक्विटी योजनेमध्ये गुंतवणूक केल्यावर पुढील परतावा गुंतवणूकदारांना मिळाला आहे.

बाजारातील मंदी ही नेहमीच तात्पुरती असते, या काळात गुंतवणूकदारांना कमी दराने युनिट खरेदी करण्यास मिळत असल्याने या संधीचा पुरेपूर फायदा घेतला पाहिजे. कोणत्याही प्रकारे मनात गोंधळ व भीतीचे विचार न आणता गुंतवणूक सुरुच ठेवावी. शक्य असल्यास एकरकमी गुंतवणूक वाढवावी.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.