परदेशी गुंतवणूक संस्था अस्वस्थ

ऑगस्ट महिन्यात परदेशी गुंतवणूक संस्थांकडून (एफआयआय) भारतीय शेअर बाजारात 2.19 अब्ज डॉलर किंमतीच्या शेअर्सची विक्री करण्यात आली आहे. ऑक्टोबर 2018 पासून गेल्या दहा महिन्यांचा विचार करता ऑगस्ट 2019 मधील विक्री सर्वाधिक आहे.

जुलै 2019 मध्ये परदेशी गुंतवणूक संस्थांनी 1.93 अब्ज डॉलर किंमतीच्या शेअर्सची विक्री केली. गेल्या दोन महिन्यात मोठ्या प्रमाणात विक्री झाली असली तरी या संस्थाची चालू वर्षी अद्यापही 7.21 अब्ज डॉलर एवढी गुंतवणूक भारतीय शेअर बाजारात आहे. अतिश्रीमंत / परकीय गुंतवणूकदारांवर कर लावण्याची केंद्रीय अर्थसंकल्पातील घोषणा, कंपन्यांचा घटलेला/मध्यम स्वरुपाचा नफा, अर्थव्यवस्थेच्या वाढीतील अनिश्चितता, अमेरिका-चीन यांच्यातील व्यापार युद्ध आणि त्याचा जागतिक वाढीवर होणारा परिणाम या सगळ्या घटकांमुळे परदेशी गुंतवणूक संस्थांकडून गेल्या दोन महिन्यात मोठ्या प्रमाणावर विक्री झाली.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×