रोखीच्या व्यवहारात वाढ

डिजिटल पद्धतीने पेमेंटला सरकारकडून प्रोत्साहन देण्यात येत असले तरी मार्च महिन्यात रोखीच्या व्यवहारांमध्ये 17 टक्क्यांनी वाढ होऊन ती 21.10 लाख कोटींवर पोचली. रिझर्व्ह बँकेच्या 2019 च्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

दुसऱ्या क्रमांकाची मोठी नोट असणाऱ्या पाचशेच्या नोटांचे व्यवहारातील चलनाचे प्रमाण 51 टक्के एवढे आहे. म्हणजेच रोखीचे सर्वाधिक मूल्यांचे व्यवहार पाचशे च्या नोटांद्वारे होत आहेत. 8 नोव्हेंबर 2016 रोजी झालेल्या नोटबंदीमागील अनेक उद्दीष्टांपैकी एक म्हणजे 86 टक्के नोटा साठवून ठेवण्यामुळे त्याचा एकंदरीत अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होत असल्याने रोखीचा वापर कमी करून डिजिटल पेमेंट पद्धतीला चालना देणे हा होता. रद्द झालेल्या नोटांपैकी 99.8 टक्के नोटा लोकांनी परत आणून दिल्या. 2017 मध्ये 7.62 लाख एवढ्या बनावट नोटा सापडल्या होत्या. 2018 मध्ये हा आकडा 5.22 लाख नोटांवर आला तर 2019 मध्ये त्यात आणखी घट होऊन तो 3.77 लाखांवर आहे.

रिझर्व्ह बँकेचा नोटा छापण्याच्या खर्चातही घट झाली आहे. 2018 च्या आर्थिक वर्षात हा खर्च 4,912 कोटी रुपये एवढा होता. 2019 च्या आर्थिक वर्षात तो 4,811 वर आला आहे. चालू वर्षात रू. 500 आणि रू. 2,000 च्या 21,000 बनावट नोटा सापडल्या आहेत. त्याचबरोबर कमी मूल्यांचा खराब झालेल्या नोटा नष्ट करण्याचे काम बँकेकडून सुरू असल्याचे अहवालात म्हटले आहे. शंभराच्या आवरण असलेल्या (वॉर्निश्ड) नोटा प्रायोगित तत्वावर चलनात आणण्याचे बँकेने ठरवले आहे. नोट खराब होऊन नष्ट करण्याची वेळ येऊ नये म्हणून ही उपाययोजना करण्यात येत आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×