“एमआयटी-एडीटी’तर्फे स्कूल ऑफ ड्रामा सुरू

पुणे – लोणी काळभोर येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्‍नॉलॉजी विद्यापीठातर्फे एमआयटी स्कूल ऑफ ड्रामा (नाट्यशास्त्र) हा तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम आणि व्हिज्युअल इफेक्‍ट्‌स व मोशन ग्राफिक्‍स या पदवी अभ्यासक्रम यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सुरूवात करण्यात येणार आहे, अशी माहिती एमआयटी एसएफटीचे अध्यक्ष आणि अधिष्ठाता डॉ. जब्बार पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुनील राय, प्रा. समर नखाते, प्रा. बैजू कुरूप उपस्थित होते. संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. मंगेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली हा अभ्यासक्रम सुरू होत आहे. जब्बार पटेल म्हणाले, एमआयटी स्कूल ऑफ ड्रामा (नाट्यशास्त्र) हा अभ्यासक्रम बारावीनंतर तीन वर्षांचा अभ्यासक्रम आहे. यासाठी प्रतिवर्षी 40 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल.

“बी.ए. इन ड्रामॉटिक आर्ट’ या विषयात विशेष अभिनय आणि थिएटर तंत्र या विषयावर अधिक भर देण्यात येणार आहे. थिएटर तंत्रज्ञानातील विशेषज्ञ, अभिनय, परिदृश्‍य (आर्किटेक्‍चर आणि स्पेस), व्हिज्युअल आर्टस, साहित्य आणि इतर परफॉर्मिंग आर्टस (संगीत, नृत्य व लोककला) या विषयातील तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन मिळणार आहे. थिएटरच्या प्रत्येक पैलू शिकण्यासाठी लागणारे व्यावहारिक व नाट्यविषयक प्रशिक्षण आणि भारतातील व आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील विविध कलांचा समावेश या अभ्यासक्रमामध्ये असेल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.