आपल्या आगामी सिनेमासाठी आयुष्मान खुरानाने स्वतःमध्ये खूप बदल करायला सुरुवात केली आहे. त्याच्या आगामी सिनेमामध्ये तो एका धावपटूच्या रोलमध्ये दिसणार आहे. आपल्यात शारीरिक बदल करण्याच्या व्यायामाला आपण सुरुवात करत असल्याचे त्याने इन्स्टाग्रामवरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
“हिअर वुई गो’ असे त्याने या पोस्टमध्ये म्हटले आहे. सोबत एक पॉवरफुल्ल इमोजीही पोस्ट केली आहे. त्याचा ट्रेनर राकेश उदियार त्याला विशेष प्रशिक्षण देणार आहे.
“केदारनाथ’चे डायरेक्शन करणाऱ्या अभिषेक कपूरवर या नव्या सिनेमाच्या डायरेक्शनची जबाबदारी असणार आहे. अद्याप नाव न ठरलेल्या या सिनेमामध्ये आयुष्मानचा लुक एकदम भन्नाट असणार आहे. अर्थात त्याबद्दल आयुष्मान आणि अभिषेक दोघांनीही पूर्ण गुप्तता बाळगली आहे.
सध्या आयुष्मान चंदिगडमध्ये आहे आणि त्याच्या ट्रेनिंगवर त्याने विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. त्याला सोशल मिडीयापासून दूर राहण्याची सूचना अभिषेक कपूरने केली आहे. या सिनेमातला त्याचा लुक इतक्यात पब्लिकसमोर येऊ नये, यासाठी ही खबरदारी घेतली आहे.
या सिनेमात आयुष्मानची हिरोईन असणार आहे वाणी कपूर आणि या वर्षी ऑक्टोबरमध्ये या सिनेमाचे शुटिंग सुरू होणार आहे. पुढच्यावर्षी या सिनेमाच्या रिलीजपर्यंत आयुष्मानला धावपटूच्याच रोलमध्ये रहावे लागणार आहे.