नवी दिल्ली – हमासने इस्रायली (hamas-Israel) ओलिसांपैकी १३ जणांच्या पहिल्या तुकडीची सुटका केली आहे. इस्रायली प्रसार माध्यमांनी इस्रायली सुरक्षा दलांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. चार दिवसांच्या युद्धविरामादरम्यान एकूण ५० ओलिसांची सुटका केली जाणार आहे.
तर इस्रायलकडून (Israel ) १५० पॅलेस्टिनींची आणि तुरुंगातील ३९ कैद्यांची सुटका केली जाणार आहे. या कैद्यांमध्ये २४ महिला आणि इस्रायली नागरिकांच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपातील दोषी कैदी आणि दगडफेकीच्या गुन्ह्यात दोषी ठरवलेल्या १५ अल्पवयीन गुन्हेगारांचाही समावेश आहे. हमासच्या ताब्यातून सुटका झालेल्यांमध्ये थायलंडचे १३ नागरिक आहे आणि आता त्यांना थायलंडला रवाना करण्यात आल्याचे थायलंडचे पंतप्रधान श्रेष्ठ थाविसीन यांनी म्हटले आहे.
चार दिवसांच्या युद्धविरामाची सुरुवात झाल्यापासून इस्रायल आणि गाझा पट्ट्यामध्ये कोठेही युद्ध सुरू नाही . मात्र गाझा पट्ट्यातील युद्धविरामाची प्रतिक्रिया म्हणून वेस्ट बँकेत हिंसाचार सुरू होण्याची शक्यता आहे. युद्धविरामाची मुदत संपल्यानंतर पुन्हा आक्रमण सुरू केले जाईल, असा इशारा इस्रायलने दिला आहे.
इंधनाचा पुरवठा सुरू
इस्रायलने दिलेल्या हमीनुसार /द्धविराममाच्या कालावधीमध्ये गाझा पट्ट्यामध्ये १ लाख ३० हजार लीटर इंधनाचा पुरवठा करण्याला परवानगी दिली आहे. प्रत्यक्षात गाझामध्ये दररोज १ दशलक्ष लीटर पेक्षा जास्त इंधनाची गरज असताना सध्या गाझा पट्ट्यामध्ये अत्यंत अल्प प्रमाणात इंधन पुरवठा केला जातो आहे. गेल्या ७ आठवड्यांपासून इस्रायलने गाझामधील इंधन पुरवठा पूर्णपणे थाबवला होता. हे इंधन हमासकडून शस्त्रांसाठी स्फोटकद्रव्य म्हणून वारपले जाण्याचा धोका इस्रायलने व्यक्त केला होता.