अपघातग्रस्त विमानचालकाचे तीन सतर्कता सूचनांकडे दूर्लक्ष

कराची : पाकिस्तानात कराची येथे कोसळलेल्या विमानाच्या चालकाने हवाई नियंत्रकांनी दिलेल्या तीन सर्तकतेच्या सूचनांकडे दूर्लक्ष केल्याचे समोर येत आहे. लॅंडिंग आधीचा विमानाचा वेग, त्याची उंची याबाबत तीन सर्तकता सूचना त्याला देण्यात आल्या होत्या.

पाकिस्तानच्या इतिहासातील सर्वात मोठी विमान दूर्घटना शुक्रवारी घडली होती. त्यात एक प्रवासी विमान नागरी वस्तीत कोसळले. त्यात 97 जणांचा मृत्यू झाला. हे विमान 10 हजार हजार फूट उंचीवरून जात होते. ते सात हजार फूट उंचीवर असणे आवश्‍यक होते. त्याची सूचना हवाई नियंत्रण कक्षाने दिली होती. त्यावेळी चालकाने विमानाची उंची कमी करण्याऐवजी मी समाधानी आहे, मी आरामात विमान उतरवू शकतो, असे उत्तर दिले होते.

या विमानात आणखी दोन तास 34 मिनिटे पुरेल इतके इंधन शिल्लक होते. पाकिस्तान सरकारकडून या विमान अपघाताला विमान चालकाचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे की तांत्रिक दोष याचा शोध घेतला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.