जंगली श्‍वापदांच्या मांसावर वुहानमध्ये बंदी

बीजिंग: वटवाघळांचे मांस खाल्ल्याने करोनाचा प्रसार झाल्याची टीका चीनवर करण्यात येत असून याबाबत अनेकांनी त्यांच्या नागरिकांच्या खाण्याच्या सवयींमुळे लक्ष केले आहे. यातून बोध घेत जीथून करोनाचा प्रसार झाला त्या वुहान शहरात जंगली श्‍वापदांचे मांस खाण्यावर बंदी लावण्यात आली आहे.

वुहानमधूनच संपूर्ण जगात करोनाचा प्रसार झाला व त्यात लाखो लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. करोनाचा जगातील पहिला रुग्ण देखील वुहानमध्येच आढळला होता. आता पुढील काळात तरी लोकांनी जंगली श्‍वशापदाचे मांस खाउ नये यासाठी येथील सरकारने पुढील पाच वर्षे हे मांस खाण्यावर बंदी लावली आहे.

जंगली श्‍वापदांची शिकार करणे तसेच त्याचा साठा करणे, बाळगणे यांवरही बंदी आहे. चीनमधील वुहानमध्ये करोनाने प्रचंड हानी झाली आहे. तीथे जवळपास तीन महिन्यांचा लॉकडाऊन करण्यात आला होता. सध्याची परिस्थिती पाहता येथे करोनावर नियंत्रण मिळविण्यात यश आले असले तरी पुन्हा परिस्थिती बदलु नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

वुहानमधील मांस बाजारातूनच करोनाचा संसर्ग आधी चीनमध्ये व नंतर संपूर्ण जगात पसरला. मुळातच चीनी लोक अनेक प्राण्यांचे तसेच पक्षांचे मांस खातात हे जगजाहीर आहे. याच बाजारात वटवाघळांसह अन्य प्राण्यांच्या मांसाची विक्री होत असते.

अर्थात केवळ हे मांस करोनाचा प्रसारासाठी कारणीभूत ठरल्याची शक्‍यता येथील विषाणू तज्ञांनी व्यक्‍त केली असली तरीही हा धोका कशामुळे पसरला याबाबत अद्याप खरे कारण समोर आलेले नाही. तरीही चीन सरकारने असे मांस खाण्यावर बंदी लावली आहे. चीनमध्ये करोनाने जवळपास 85 हजार लोकांना संसर्ग झाला असून 5 हजार लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.