जनता विरोधकांना जागा दाखवणार

आमदार संग्राम थोपटे : वीसगाव खोऱ्यात जोरदार प्रचार

भोर – भोर-वेल्हे-मुळशी तालुक्‍यांत कोट्यवधींची विकासकामे आघाडी सरकारच्या काळात कॉंग्रेसच्या माध्यमातून झाली आहेत. परंतु विरोधक विकासाचे नाव बाजूला ठेऊन जाती -पातीचे राजकारण करुन अपप्रचार करुन मतदारांना भडकविण्याचे काम करतात. मात्र, माझी मावळी जनता सुज्ज्ञ असल्यामुळे येणाऱ्या सोमवारी (दि. 21) मतदानाच्या स्वरुपात मते देऊन विरोधकांना त्यांची जागा दावून दिल्याशिवाय राहणार नाही, असा विश्‍वास आमदार संग्राम थोपटे यांनी व्यक्‍त केला.

भोर विधानसभा मतदारसंघातील महाआघाडीचे कॉंग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम थोपटे यांच्या प्रचारार्थ वीसगाव खोऱ्यातील बाजारवाडी येथील गावाभेट प्रचार दौऱ्यात मतदारांशी त्यांनी संवाद साधला.

माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्यापासून एकनिष्ठ असलेल्या कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्यात चिखलावडे, आंबेघर, पोंबडी, शिरवली, भोर, वेनवडी, वडगाव डाळ, उत्रौली, भाबवडी, खानापूर, हातनोशी, बाजारवाडी, धावडी, पळशोसी, पाले, वरोडी खुर्द, वरोडी डायमुख, वरवडी बुद्रुक, आंबाडे, बालवडी, नेरे, गोकवडी या भागात गावभेट प्रचार दौरा केला. यावेळी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णाजी शिनगारे, तालुकाध्यक्ष शैलेश सोनवणे, उत्तम थोपटे, विठ्ठल कुडले, दिनकर कुडले, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत सागळे, भाऊ तारू, संपत दरेकर, तुषार शिंदे, प्रमोद थोपटे, हनुमंत चव्हाण, राजू शिंदे, विकास शिंदे, मारुती चव्हाण, अशोक फाटक, नवनाथ मानकर, आप्पा गोळे, अंकुश सावले, अनिल सावले, विकास शिंदे, बाळकृष्ण शिंदे, अर्जुन शिंदे, बापूसहेब गाडे, धनंजय पोळ आदिंसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.