बॅंकांकडून कर्ज वेगात देण्याची प्रक्रिया सुरू

कर्ज घेणाऱ्यांची सरकारी बॅंकांकडून वेगात ऑनलाईन “केवायसी’ प्रक्रिया

पुणे – कर्जाचा उठाव वाढावा म्हणून बऱ्याच बॅंकांनी आपल्या कर्जाचे व्याजदर कमी केले आहेत. आता सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांनी “पीएसबी लोन्स इन 59 मिनिटस्‌’ ही ऑनलाईन योजना सुरू केली आहे. या अगोदर ही योजना छोट्या उद्योगांना कर्जपुरवठा करण्यासाठी सुरू करण्यात आली होती. आता काही बॅंकांनी ही योजना वैयक्‍तिक कर्ज व घरासाठीच्या कर्जासाठीही सुरू केली आहे.

याबाबत स्पष्टीकरण करताना स्टेट बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, बॅंकेने 59 मिनिटांत कर्ज पोर्टलवरून वैयक्‍तिक कर्ज आणि घरासाठीच्या कर्जाची योजना सुरू केली आहे. याअगोदर ही योजना छोट्या उद्योगांसाठी सुरू केली होती. ती बऱ्याच प्रमाणात यशस्वी झाली. त्यानंतर अशी योजना इतर कर्ज घेणाऱ्यांना उपलब्ध करता येईल का, या शक्‍यतेवर विचार केला जात होता. कर्जाचा वापर वाढावा यासाठी बॅंका अनेक पातळ्यांवर प्रयत्न करीत आहेत.

प्रक्रिया 59 मिनिटांत संपणे अपेक्षित
सार्वजनिक क्षेत्रातील बऱ्याच बॅंका 59 मिनिटांत कर्जास तत्त्वतः मंजुरी देतात. यामध्ये स्टेट बॅंक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बॅंक, बॅंक ऑफ बडोदा, युनियन बॅंक ऑफ इंडिया या बॅंकांचा समावेश आहे. अशा प्रकारच्या कर्जासाठी अर्ज केलेल्या व्यक्‍तीच्या प्राप्तिकर विवरण आणि बॅंक स्टेटमेंटची ऑनलाईन पडताळणी केली जाते. कर्ज घेणाऱ्यांनी आवश्‍यक ती माहिती अपलोड केल्यानंतर या माहितीचे विश्‍लेषण करणारी यंत्रणा (अल्गॉरिथम) कार्यरत होते. त्या आधारावर संबंधित व्यक्‍तीला किती कर्ज दिले जाऊ शकते याचे पर्याय उपलब्ध होतात. ही प्रक्रिया 59 मिनिटांत संपणे अपेक्षित आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)