भिंगारच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप

भिंगार – येथील उत्थापन पूजा जिल्हा पोलिस अधीक्षक इश्‍यु सिंधू यांच्या हस्ते झाली.त्यानंतर मिरवणूकस प्रारंभ झाला.याप्रसंगी सिंधू हे मानाच्या गणपतीचे भोई झाले होते.यावेळे शेवगावचे डिवाय एसपी मंदार जावळे उपस्थित होते.

ब्राह्मणगल्लीतील मानाच्या देशमुख गणपतीचे प्रमुख समीर देशमुख,अश्‍विन देशमुख,कार्तिक देशमुख यासह कॉंग्रेसचे आर.आर.पिल्ले,शाम वाघस्कर भाजपच्या नगरसेविका शुभांगी साठे,राष्ट्रवादीचे संजय सपकाळ,शिवसेनेचे नगरसेवक रवींद्र लालबोंद्रे.कलगीतुरा मंडळाचे सुनिल करडिले आदिंसह गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

काही वर्षांपूर्वी प्रकाश लुणिया यांनी अर्पण केलेल्या पालखीतून मानाच्या देशमुख गणपतीची मिरवणूक काढण्यात आली.ही पालखी शब्बीर सय्यद यांनी फुलांनी सजवली होती.तर सनई चौघडा वादन गयाजभाई शेख यांनी केले. रुद्रनाद ढोलपथकाने मानाच्या गणरायाला पहिली सलामी दिली.
यानंतर इतर मंडळे सहभागी झाले होते.एकुण पंधरा मंडळे सहभागी होतील असे कॅंप पोलिसांनी सांगितले. मोहरमच्या पाश्‍वभूमीवर येथील गणेश विसर्जन मिरवणुकीत मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच मिरवणुक मार्गाला जोडणारे सगळे रस्ते बंद करण्यात आले होते.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.