‘आऊटसाईडर’ म्हटल्याचा अभिमान

विद्युत जमवालचा “जंगली’ नुकताच रिलीज झाला. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये दाखवल्याप्रमाणेच विद्युत जमवालची भन्नाट ऍक्‍शन बघून प्रेक्षक जाम खूष झाले आहेत. बॉक्‍स ऑफिसवर “जंगली’चा फारच चांगला परफॉर्मन्स दिसायला लागला आहे. विश्‍लेषकांनीही विद्युतच्या परफॉर्मन्सचे खूप कौतुक केले आहे. या सिनेमाचे डायरेक्‍टर चक रसेल यांनी यापूर्वी हॉलिवूडमधील “द मास्क’ केला होता. त्यामुळे “जंगली’तील अॅक्‍शनवर हॉलिवूडचा प्रभाव पडलेला स्पष्ट दिसतो आहे.

विद्युत जमवालला आताअ्क्‍रशन हिरो म्हणून चांगली ओळख बॉलिवूडमध्ये मिळाली आहे. मात्र तरिही त्याच्या नावापुढे “आऊटसाईडर’ असा टॅग चिकटला आहे. त्याचे कारण त्याने बॉलीवूडमध्ये शिरकाव केल्यानंतर मध्यंतरी बराच मोठा ब्रेक घेतला होता. त्यानंतर केवळ अॅक्‍शन हिरोचेच रोल त्याच्या वाट्याला येत गेले आणि विद्युत ते रोल करत गेला. “आऊटसाईडर’चा टॅग चिकटणे बॉलीवूडमधील करिअरच्या दृष्टीने हानीकारक आहे, हे त्यालाही मान्य आहे. मात्र आता तो देखील हा टॅग हटवण्यास उत्सुक दिसत नाही.

कारण विद्युत स्वतःला एक स्ट्रगलर आर्टिस्ट मानतो आहे. तो मिडलक्‍लास फॅमिलीमधून आला आहे. त्यामुळे स्वतःला सेलिब्रिटी म्हणवून घेण्याची त्याची तयारी नाही. एखादा माणूस जर मर्सिडीझमधून स्ट्रगल करत असेल आणि दुसरा एखादा जर कोणत्याही वाहनाशिवाय स्ट्रगल करत असेल, तर त्या दोघांच्या स्ट्रगलची तुलना केली जाऊ शकणार नाही. कोणत्याही वाहनाशिवाय स्ट्रगल करणाऱ्याचे यश हे मर्सिडीझवाल्यापेक्षा जास्त मोलाचे आहे. स्वतःच्या कमाईने मर्सिडीझ खरेदी करण्यात मजा आहे. असे विद्युत मानतो. त्याने दिलेले उदाहरणही इतके भन्नाट आहे की बास्स.

बॉलीवूडमधील प्रवास खरेच अवघड आहे. मात्र जर टॅलेंट असेल तर मुंबई तुम्हाला स्वीकारतेच. त्यामुळे “आऊटसाईडर’ म्हटल्याचा आपल्याला राग येत नाही, असे तो म्हणतो.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.