इन्स्टाग्रामवरच्या ‘कॉपी-पेस्ट’मुळे प्रिया वारियर ट्रोल

गेल्या वर्षीच्या व्हॅलेंटाईन डे च्या सुमारास “ओरू अदार लव्ह’ या मल्याळम सिनेमात डोळा मारण्याच्या 10 सेकंदांच्या व्हिडीओमुळे प्रिया वारियर रातोरात हिट झाली होती. शालेय जीवनातील प्रेमावरच्या सिनेमातल्या या हिरोईनला त्यानंतर कित्येक दिवस सोशल मीडियावर फॉलो केले जात होते. तिच्य नावाने गुगलवर लक्षावधी वेळा सर्च झाला असेल. तिच्या घरापर्यंत फॅन्सनी माग काढायला सुरुवात केली. ही प्रसिद्धी इतकी वाढली की तिला काही काळ सुरक्षाही पुरवली गेली होती, असे समजले होते.

मात्र आता त्याच प्रिया वारियरला सोशल मिडीयावर प्रचंड ट्रोलिंगला सामोरे जावे लागते आहे. त्याचे कारण तिचा कोणताही नवीन व्हिडीओ, एखादे हॉट बिकिनी फोटोशूट किंवा अन्य काही अदा नाही. तर तिने इन्स्टाग्रामवर केलेल्या पोस्ट चक्क “कॉपी पेस्ट’ असल्याचे सिद्ध झाले आहे.

तिने इन्स्टाग्रामवर स्वतःच्या एका जाहिरातीतील काही फोटो शेअर केले होते. त्याबाबत कॅप्शनमध्ये अधिक माहिती लिहीण्याच्या जागेवरचा मजकूर वाचला की तिने काय गडबड केली आहे, हे लक्षात येते. या कॉमेंट बॉक्‍समध्ये तिने “इन्स्टाग्राम आणि फेसबुकसाठी टेक्‍स्ट कंटेंट’ असे लिहीले होते. प्रियाकडून गडबडीत झालेली ही चूक तिला चांगलीच महाग पडते आहे. तिने कॉमेंट बॉक्‍समध्ये काही टाईप करण्यापूर्वीच तिच्या कॉमेंट बॉक्‍समधील कॅप्शनमधील रेडीमेड मजकूर कॉपी पेस्ट केला गेला होता. तिला ट्रोल केले गेल्यावर तिने झटक्‍यात आपली चूक सुधारली. पण तिच्यावर “कॉपी पेस्ट’ करण्याचा शिक्‍का बसला तो कायमचाच.

प्रिया वारियर सध्या बॉलीवूडमध्ये शिरकाव करण्याच्या तयारीत आहे. प्रशांत मंमबुलीच्या “श्रीदेवी बंग्लो’मध्ये प्रिया दिसणार आहे. श्रीदेवीच्या अखेरच्या काळातील प्रसंग आणि मृत्यूच्यावेळची नाट्यमयता यामध्ये दर्शवलेली असेल. त्यामुळे बोनी कपूरने आगोदरच या सिनेमाला विरोध करायला सुरुवात केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.