पुणे – प्रादेशिक परिवहन कार्यालयातून पसंती क्रमांक घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यामध्ये 0001 क्रमांकाला मोठी मागणी आहे. शहरात चारचाकी वाहनाला यासाठी तब्बल पाच लाख रुपये भरावे लागतात. त्या पाठोपाठ 0009, 0007 क्रमांकाला पसंती आहे. यासाठीही अडीच लाख मोजावे लागतात. मात्र हे क्रमांक घेतल्यावर वाहन चालक अनेकदा नंबरप्लेटच्या नियमांचे उल्लंघन करताना दिसतात. ते हा क्रमांक फॅन्सी स्वरुपात लिहतात किंवा पुढे तीन शून्य लावत नाहीत. नियमानुसार नंबरप्लेट ही चार अंकी असावी लागते. यामुळे तुम्हाला जर एक ते तीन अंकांमध्ये नंबर मिळाला असेल तर त्यापुढे तीतके शून्य लावणे आवश्यक आहे. तसे नसल्यान तुमच्यावर प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि वाहतूक पोलिसांना दंडात्मक कारवाई करण्याचा अधिकार आहे. या प्रकारचा दंड अनेकांना ऑनलाइन पडला आहे. मात्र नियम माहिती नसल्याने दंड पडणारे चुकीची कारवाई केली गेली असा समज करुन घेतात.
वाहन चालकांना नंबर प्लेटची कारवाई म्हणजे, फॅन्सी नंबर प्लेट किंवा एखादा नंबर न दिसण्या इतका बारीक लिहणे, एखादया नंबरचा एखादा आकडा काढून टाकणे इतकीच कारवाई नियमात बसते असे वाटत असते. मात्र नंबर प्लेटही चार आकडी असावी हे त्यांच्या ध्यानी मनीही नसते. जेव्हा शोरुम चालक स्वत:हून नंबर टाकून देतात तेव्हा ते नियमांचे पालण करतात.
आता तर प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून हाय सिक्युरिटी नंबरप्लेट गाडीबरोबर बसवून दिली जाते. त्यानंतरच गाडीची डिलिव्हरी मिळते. यामुळे नंबरप्लेटच्या नियमांचे काटेकोर पालन होते. मात्र काही जुन्या गाड्यांवर असलेल्या चुकीच्या नंबर प्लेटकडे वाहन मालक अद्यापही दुर्लक्ष करतात.
अनेकदा नंबर प्लेट फॅन्सी बनवताता किंवा दुसऱ्यांदा नंबर लिहताना चार डिजीटकडे लक्ष दिले जात नाही. एक अंकी, दोन अंकी किंवा तीन अंकी नंबर असेल तर त्यापुढे शून्य लावला जात नाही. जे वाहन चालक वाहनाची नंबर प्लेट स्वत:हून बनवून घेतात ते अनेकदा याचा विचार करत नाही.
सध्या ऑनलाइन दंडाचा धडाक सुरू असल्याने जवळपास प्रत्येक वाहन चालकास काही ना काही दंड पडत आहेत. यातच नंबर प्लेट चारअंकी नसणाऱ्यांनाही दंड बसत आहेत. यामुळे आपल्या वाहनांची नंबर प्लेट एक ते तीन अंकादरम्यान असेल तर पुढे शून्य लावून चार डिजीटचे करुन घ्यावे. अन्यथा दंडात्मक कारवाई होणार हे निश्चि आहे. फॅन्सी किंवा नियमात नसणाऱ्या नंबर प्लेटसाठी एक हजार इतका दंड आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नियमानुसार आखून दिलेल्या नियमांतच नंबर प्लेट असावी लागते. यामध्ये नंबर प्लेट चार डिजिटमध्ये असावी हा नियमच आहे. या नियमाचे पालन न केल्यास प्रादेशिक परिहवन कार्यालय आणि वाहतूक पोलीस दोघांनाही कारवाई करण्याचा अधिकार आहे.
-अजित शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे