गणेशमूर्तींवर फिरतोय अखेरचा हात

मूर्ती महागणार

मूर्ती कारागीर आपल्या कारखान्यात गणेश मूर्तीवर अखेरचा हात मारण्यात व्यस्त आहेत; मात्र यावर्षी कच्च्या मालाचे वाढलेले भाव, वाढती मजुरी त्यामुळे गणपतीच्या मूर्तीच्या किमतीमध्ये वीस ते पंचवीस टक्‍के भाववाढ होणार आहे. कारागीर रात्रंदिवस मूर्ती तयार करण्यात व्यस्त आहेत. मोठी मंडळे गणेशमूर्ती बुकिंग करु लागली आहेत. सार्वजनिक गणेश मंडळे पाच हजार रुपयांपासून एक लाख रुपयांपर्यंत मूर्ती बुकिंग करत असल्याचे मंचर येथील गणेशमूर्ती कारागीर बंडेश गांजाळे आणि आदर्शगाव गावडेवाडी येथील मूर्ती कारागीर श्रीधर राजगुरू यांनी सांगितले.

मंचर – गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे शहराबरोबरच खेड्यापाड्यातही मूर्तिकार मूर्तीवर अखेरचा हात फिरवण्यात व्यस्त आहेत. मंचर परिसरात गणेशोत्सवाची धामधूम सुरु झाली आहे.

यावर्षी गणेशमूर्ती बनविण्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे प्लॅस्टर ऑफ पॅरिस, काथ्या, विविध प्रकारचे रंग, रंगीबिरंगी खडे यांच्या भावात 20 ते 25 टक्‍के वाढ झाली आहे.

यामुळे मूर्तीमध्ये तेवढ्याच प्रकारची भाववाढ होणार असल्याचे कारागीर सांगतात. छोटी-मोठी मंडळे मोठ्या मूर्ती खरेदी करण्यावर भर देत आहेत. गणेशमूर्ती कारागीर कारखान्यात जास्तीत जास्त महिलांना मजूरी देऊन कामावर ठेवत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.