नवी दिल्ली : कोरोनाशी लढण्यासाठी पोलीस आणि आरोग्य कर्मचारी आपले दिवसरात्र एक करत आहेत. दरम्यान, केंद्र आणि सोबत राज्य सरकारांकडून डॉक्टरांना नीट वागणूक दिली जावी असे वारंवार सांगण्यात येत असतानाच दुसरीकडे काही ठिकाणी डॉक्टरांना योग्य वागणूक दिली जात नसल्याचे समोर आले आहे. नुकतेच दिल्लीमधील सफदरजंग येथे कार्यरत असणाऱ्या दोन महिला डॉक्टरांना मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिला डॉक्टर घरातील सामान खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडल्या असताना त्यांना मारहाण करण्यात आली.
#UPDATE A 44-year-old man has been arrested for allegedly assaulting two female doctors of Safdarjung Hospital, after an FIR was registered in the case: Delhi Police https://t.co/QYN9Tqrj9K
— ANI (@ANI) April 9, 2020
महिला डॉक्टर गौतम नगर येथे वास्तव्यास असून जवळच्या मार्केटमध्ये गेल्या होत्या. यावेळी तिथे एका व्यक्तीने त्यांचा रस्ता रोखला. ही व्यक्ती वारंवार त्यांना घराबाहेर पडल्यावरुन बोलत होती. तुमच्यामुळे कोरोनाचा फैलाव होईल असे सांगत ही व्यक्ती डॉक्टरांना येथे थांबू नका सांगत अपमान करत होती. डॉक्टरांनी आक्षेप घेतला असता त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.
डॉक्टरांनी, “आम्ही तिथे फळं विकत घेत होतो. तेव्हा ही व्यक्ती अंतर ठेवा असे ओरडून सांगत होती. करोना व्हायरसचा फैलाव करण्यासाठी त्याने आम्हाला जबाबदार ठरवले आणि मारहाण केली” असे डॉक्टरांनी म्हटले आहे.