कांदा बाजारभावप्रश्‍नी संसदेत आवाज उठविणार

खासदार अमोल कोल्हे : सविंदणे येथे ग्रामपंचायतीच्या इमारतीचे उद्‌घाटन

भरपावसात कोल्हेंच्या सभेला गर्दी

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे भाषण सुरू होताच पाऊस सुरू झाला. कार्यक्रमाला नागरिकांची गर्दी होती. भरपावसात ग्रामस्थ व विद्यार्थ्यानी टाळ्या शिट्यांनी दाद देत खासदांरांचे स्वागत करीत भाषण ऐकले. गेल्या अनेक दिवस पावसांसाठी चातकाप्रमाणे नागरिक पावसांची वाट पाहत होती. मात्र खासदारांचे आगमन व सकाळपासून पावसाने सुरूवात केल्याने नागरिकांमध्ये उत्साह ओसंडून वाहत होता.

सविंदणे  – शिरूर आणि आंबेगाव तालुक्‍यातील शेतकऱ्यांची रोजीरोटी कांद्याच्या बाजारभावावर अवलंबून आहे. बाजारभावप्रश्‍नी निश्‍चितच लोकसभेमध्ये आवाज उठवून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे, असे आश्‍वासन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिले.

सविंदणे (ता. शिरुर) येथील विविध विकासकामांच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, ऍड. अशोक पवार, राम कांडगे, भीमाशंकरचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे, संचालक प्रदीप वळसे पाटील, जि. प. उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, घोडगंगाचे संचालक राजेंद्र गावडे, मानसिंग पांचुदकर, सभापती विश्‍वास कोहकडे, जिल्हा परिषद सदस्या सुनिता गावडे, सविता बगाटे, कुसुम मांढरे, पंचायत समिती सदस्या अरुणा घोडे, तनुजा शेलार, ठेकेदार सोनवणे, एस. एस. के. असोसिएटचे सिद्धेश बोहरा, संकेत खाबिया आदी उपस्थित होते.

खासदार कोल्हे म्हणाले की, सविंदणे येथे सरपंच वसंत पडवळ यांनी वर्षभरात पाठपुरावा करून कोट्यवधी रुपयांचा निधी जिल्हा परिषद, पंचायत समितीमार्फत आणला आहे. त्यांनी गावाचा कायापालट केला आहे. असा सरपंच प्रत्येक गावाला मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्‍त केली. लोकसभेच्यावेळी ज्याप्रमाणे आपण आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझ्यावर विश्‍वास दाखवून मला लोकसभेत पाठवले. त्याचप्रमाणे निश्‍चितच मी आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध राहील.

दिलीप वळसे पाटील म्हणाले की, भागातील पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी आपण लवकरच पाणी परिषद घेणार आहे. अमोल कोल्हे यांच्या माध्यमातून आपल्या भागाच्या विकासात निश्‍चितच भर पडणार आहे. निलेश पडवळ, भूषण पडवळ यांनी प्रास्तविक केले. बाळासाहेब पडवळ यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)