कराड -जिल्ह्यात करोनाच्या चाचण्या मोठ्या प्रमाणात व जलदगतीने होत असल्याने बाधितांची संख्या वाढत आहे. आरोग्य विभागाकडे शनिवारी (दि. 1) रात्री आलेल्या अहवालांमध्ये कराडमधील तीन कोव्हिड रुग्णालयांमध्ये आजपर्यंतचे एकाच दिवसातील सर्वाधिक बाधित रुग्ण आढळले आहेत. या अहवालांनुसार तालुक्यात 58 जण पॉझिटिव्ह आले आहेत. कराड तालुक्यातील बाधितांच्या संख्येची हजाराकडे वाटचाल सुरू आहे.
कराड तालुक्यातील टेंभू येथील 55, 30 वर्षीय महिला, 28, 55 वर्षीय पुरुष, 16 वर्षीय तरुण, शिवडेतील 23 वर्षीय महिला, 29, 27 वर्षीय युवक, वडोलीतील 48 वर्षीय पुरुष, उंब्रज येथील 25 वर्षीय युवक, 27 वर्षीय महिला, 13 वर्षीय मुलगा, गोंडी येथील 35 वर्षीय महिला, मानव येथील 50 वर्षीय महिला 22 वर्षीय युवक, मुजावर कॉलनीतील 46, 51, 40 वर्षीय पुरुष, कार्वेतील 60, 23 वर्षीय महिला, शहरातील बुधवार पेठेतील 21, 22 वर्षीय तरुणी, 40 वर्षीय महिला, 59 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठेतील 15, 16 वर्षीय मुले, 38, 45 वर्षीय महिला, 48, 50 वर्षीय पुरुष, शनिवार पेठेतील 15 वर्षीय मुलगी.
11 वर्षीय मुलगा, 40 वर्षीय महिला, मलकापूर येथील 59 वर्षीय पुरुष, चोरे येथील 33 वर्षीय युवक, इंदोलीतील 25, 32, 31 वर्षीय युवक, कालवडे येथील 21 वर्षीय युवक, 53 वर्षीय महिला, कार्वे नाका येथील 32 वर्षीय महिला, कृष्णा मेडिकल कॉलेजमधील डॉक्टर, कोयना वसाहतीतील 35 वर्षीय महिला, 3 वर्षीय बालिका, नारायणवाडी येथील 36 वर्षीय युवक, शारदा क्लिनिकमधील 65, 26, 40, 51 वर्षीय महिला, 61, 85, 87, 23 वर्षीय पुरुष, उंब्रज येथील एक पुरुष,
वडगाव येथील 33 वर्षीय युवक, वाठार येथील 35 वर्षीय युवक, सह्याद्री हॉस्पिटलमधील 34, 60 वर्षीय पुरुष, अशा एकूण 58 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे तालुका प्रशासनाची काळजी वाढली असून नागरिकांना नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी केले आहे.