सातारा -जिल्ह्यात विविध रुग्णालये आणि करोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 44 नागरिकांना दहा दिवसांनंतर रविवारी घरी सोडण्यात आले. आणखी 306 जणांच्या घशातील स्रावांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
खंडाळा तालुक्यातील कबुले आळी (शिरवळ) येथील 32 वर्षीय युवक, 29, 31, 28 वर्षीय महिला, 5 वर्षीय बालक, 7 वर्षीय बालिका, तळेकर वस्ती 35 वर्षीय महिला, 13 वर्षीय मुलगा, 60 वर्षीय पुरुष, सातारा तालुक्यातील कण्हेर येथील 72 वर्षीय पुरुष, तामजाईनगर येथील एक वर्षाचे बालक, 66 वर्षीय पुरुष, रामकृष्णनगर (काशीळ) येथील 40 वर्षीय पुरुष, अंगापूर वंदन येथील 44 वर्षीय पुरुष, 37, 36 वर्षीय महिला,
8 वर्षांची बालिका, शेळकेवाडीतील 40 वर्षीय महिला, 18 वर्षांची युवती, 12 वर्षाची मुलगी, 15 वर्षांचा मुलगा, शिवाजीनगर (शाहूपुरी) येथील 24 वर्षीय युवक, 52 वर्षीय महिला, माण ताललुक्यातील आंधळी येथील 65 वर्षीय महिला.
वाई तालुक्यातील पाचवड येथील 50 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय महिला, बावधन येथील 70 वर्षीय पुरुष, शेंदूरजणे येथील 48, 30 वर्षीय पुरुष, पसरणीतील 65 वर्षीय महिला, खटाव तालुक्यातील वडूज येथील 29, 23, 24, 28 वर्षीय युवक,
शिंदेवाडीतील 60 वर्षीय महिला, जावळी तालुक्यातील सायगाव येथील 34, 72 वर्षीय पुरुष, 56 वर्षीय महिला, दापवडीतील 52, 22, 74 वर्षीय महिला, 20, 54, 24 वर्षीय पुरुष, यांना आज घरी सोडण्यात आले.
दरम्यान, क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयातील 20, फलटण उपजिल्हा रुग्णालयातील 41, खंडाळा येथील 75, पानमळेवाडीतील 75, मायणीतील 28, महाबळेश्वर येथील 17, खावलीतील 50, अशा एकूण 306 जणांच्या स्रावांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, जिल्ह्यात करोना मुक्त होणारांची संख्या समाधानकारक आहे. मात्र, दिवसेंदिवस वाढत असलेल्या कारोनाबाधितांची संख्या आटोक्यात येणं देखील महत्वाचे आहे.