औरंगाबाद : औरंगाबाद शहरात कोरोनाबाधितांची झपाट्याने वाढ होत आहे. आज दिवसभरात शहरात 21 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे औरंगाबादमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 130 वर गेली असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदिप कुलकर्णी यांनी दिली आहे. तर आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयात (घाटी) 9 तर चिकलठाणा येथील जिल्हा रुग्णालयात (मिनी घाटी ) त 91 जणांवर उपचार सुरु आहेत.
दरम्यान आज आढळलेल्या रुग्णांमध्ये नूर कॉलनीतील 11, किलेअर्कमधील 2, आसेफिया कॉलनीतील 5, भीमनगरमधील एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा 130 वर गेला असून, आतापर्यंत 23 कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. अशी माहिती डॉ प्रदिप कुलकर्णी यांनी दिली आहे. शहरात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असल्यामुळे शहरातील काही भाग सील करण्यात आला आहे. नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.