काेराेना बाधितांची संख्या घटली, आता पुण्यातील उद्याोजक म्हणतात…

उद्योगांना मागणीप्रमाणे ऑक्सिजन पुरवठा करा

पुणे – करोना बाधित रुग्णांना ऑक्सिजनची गरज लक्षात घेऊन एकूणपैकी 80 टक्के उत्पादन वैद्यकीय कारणासाठी आरक्षित करण्यात आले आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून करोनाग्रस्तांच्या संख्येत घट झाली आहे. परिणामी, ऑक्सिजनच्या मागणीवर त्याचा सकारात्मक परिणाम झाला असून, शिल्लक ऑक्सिजनचा पुरवठा मागणीप्रमाणे उद्योगांना करा, अशी मागणी उद्योजकांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन केली आहे.

 

शहरासह जिल्ह्यात करोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत होता. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातूनही ऑक्सिजनचा पुरवठा केला जात होता. पुणे विभागात तसेच जिल्ह्यासाठी दररोज साडतीनशे मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज भासत होती.

 

परंतु, मागील दोन आठवड्यांपासून करोना बाधितांचे प्रमाण कमी झाले आहे. त्याचा सकारात्मक परिणाम ऑक्सिजनच्या मागणीवर झाले आहे. वैद्यकीय कारणासाठीच्या ऑस्किजनची मागणी कमी झाली आहे. दरम्यान, आरोग्य विभागाच्या मागणीनुसार पुरवठा करणे, वितरण साखळी याचे प्रत्यक्षात लेखापरीक्षण केल्याने ऑक्सिजनच्या पुरवठा सुरळीत करण्यात आला, असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.