बारामती (प्रतिनिधी) – बारामती शहर व तालुक्यात आज नव्याने 56 कोरोना संक्रमीत रुग्ण आढळल्याचे तपासणी अहवालात निष्पन्न झाले आहे. बारामतीत एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 901 वर पोहोचली असून आतापर्यंत 39 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे.
बारामतीत दिनांक 31 रोजी 139 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. शहरातील १९ व ग्रामीण भागातील १८ एकूण ३७ रुग्ण पॉझिटिव आले. तसेच खाजगी एंटीजेन नमुने ७६ घेण्यात आले होते. त्यापैकीग्रामीण भागातील १३ आणि शहरातील ६ असे १९ रुग्ण कोरोना संक्रमित असल्याचे आढळले.
बारामतीची एकूण रुग्ण संख्या 901 झाली असून दिनांक 31 रोजी दिवसभर शहरातील तीन व ग्रामीण भागातील एकाचा मृत्यू झाला, एकूण मृत्यू संख्या 39 वर पोहोचले आहे.