बारामती, (प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बारामती येथे सुरक्षेसाठी उपलब्ध झालेले केंदीय औद्योगिक सुरक्षा बलकडील एकूण ३ कंपनीमधील एकूण २७० पोलीस अधिकारी व जवान यांचेव्दारे अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्या नेतृत्वाखाली बारामती शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संतोष घाोळवे,
सहायक पोलीस निरीक्षक गजानन चेके, पोलीस उप निरीक्षक संध्याराणी देशमुख आदी अधिकारी व बारामती शहर पोलीस स्टेशन कडील २० पोलीस अंमलदार अशांचा संयुक्त रूट मार्च काढण्यात आला.
रूट मार्च उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती येथून सुरू होऊन कदम चौक गांधी चौक- गुणवडी चौक- इंदापूर चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक आमराई, मुख्य पोस्ट ऑफीस, दत्त मंदिर चौक, भिगवण चौक पतंगशहा नगर ते द खाईस्ट चर्चमार्गे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय बारामती अशा प्रमुख रस्त्यावरून शस्त्रधारी केंदीय औद्योगिक सुरक्षा बलाचे जवांनांव्दारे संचलन करण्यात आले.
याप्रसंगी बारामती शहरातील गजबजलेल्या रस्त्यांवर बहुसंख्य नागरिकांची गर्दी झाली होती. आगामी लोकसभा निवडणुका निर्भिडपणे पार पाडण्यासाठी वातावरण निर्मिती झाली होती.