नवी दिल्ली – इंग्लंड महिला संघातील खेळाडूंना करोनाची बाधा झाल्याने एफआयएचप्रो हॉकी लीगचे पुढील दोन सामने स्थगित करण्यात आले आहेत. हे सामने 2 आणि 3 एप्रिलला भुवनेश्वरच्या किलग स्टेडियमवर होणार होते.
इंग्लंडचे काही खेळाडू करोनाबाधित असून काहींना दुखापतीही झाल्या आहेत. याचा त्यांच्या तयारीवर परिणाम झाला आहे. एफआयएच, हॉकी इंडिया आणि इंग्लंड हॉकी संघटना पुढील गोष्टींबाबत लवकरच निर्णय जाहीर करतील, असे एफआयएचने सांगितले आहे.
इंग्लंडचा महिला संघ 2 आणि 3 एप्रिलला प्रो लीगचे सलग दोन सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा करणार होता. मात्र, त्यांच्या संघातील अनेक खेळाडूंचा करोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, तर काही खेळाडू दुखापतीमुळे उपलब्ध नाहीत. महिलांचे सामने स्थगित करण्यात आले असले, तरीही पुरुषांचे सामने या आठवडयात ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होतील.