मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील सामील होत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह एकूण 9 आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. यानंतर आता मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या या मंत्र्यांना कोणती खाती दिली जाणार यावर आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. मात्र, त्यापूर्वीच या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार याची संभाव्य यादी समोर आली आहे. त्यामुळे सध्या गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अजित पवार यांच्या यांच्या गटाला जी खाती मिळणार आहेत. त्याची संभाव्य यादी समोर आली आहे. अजित पवार यांना महसूल मंत्री खातं, दिलीप वळसे पाटील यांना सांस्कृतिक आणि कृषि खातं मिळणार असल्याची माहिती आहे.
हसन मुश्रीफ यांना अल्पसंख्यांक, कामगार मंत्रीपद, तर छगन भुजबळ यांना ओबीसी आणि बहुजन विकास खातं, धनंजय मुंडे यांना सामाजिक न्याय खातं मिळणार असल्याची संभाव्य यादी समोर आली आहे. या बाबतचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे.
अजित पवार यांनी रविवारी राज्याचे नवे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासोबत छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील. हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा अत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल पाटील यांनीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.