रेडा (प्रतिनिधी) – पाच हजार वर्षांपूर्वीची भारताची योग परंपरा आहे. ही योग संस्कृती जगातील 173 देशाने स्वीकारली असून योगाचे जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे, असे मत हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.
इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाने माजी संसदीय व सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, संस्थेचे उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव मुकुंद शहा यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी जागतिक योग दिनानिमित्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना क्रीडा संचालक डॉ. भरत भुजबळ यांनी ऑनलाइन योग प्रशिक्षणाचे धडे देऊन मानवी जीवनातील योगाचे महत्व सांगितले. यामध्ये 74 प्राध्यापकांनी सहभाग नोंदविला.