नगर – सुभेदारगल्ली, माळीवाडा भागात नवे रुग्ण आढळल्याने प्रशासनाने हा परिसर बफर झोन घोषित केला आहे. मात्र, त्यामुळे साधारणतः दोन किलोमीटर वर्तुळ परिसरात अत्यावश्यक सेवाही ठप्प झाल्या आहेत. त्यात डाळमंडई व आडतेबाजाराचाही समावेश असल्याने तेथील होलसेल मार्केटमध्ये जीवनावश्यक वस्तू अडकून पडल्या आहेत.
बफर झोनच्या अगदी शेवटच्या अंतरात हा परिसर येतो. मात्र, या भागात कडक निर्बंध असल्याने तेथील व्यापारी होलसेलची दुकानेही उघडू शकत नाहीत. त्यामुळे या भागात करोनाचा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या अन्य नियमांचे काटेकोर पालन करुन जीवनावश्यक वस्तू पुरविणारी ही दुकाने सुरु करण्याची परवानगी द्यावी, अशी सूचना आमदार संग्राम जगताप यांनी आज महापालिका प्रशासनाला केली.
आडते बाजार मर्चंट असोसिएशन व व्यापाऱ्यांनी आमदार जगताप यांच्या नेतृत्वाखाली आज आयुक्त श्रीकांत मायकलवार यांची भेट घेऊन डाळमंडई व आडते बाजार परिसरात निर्माण झालेल्या