मंत्रिमंडळ विस्तारात ‘या’ रिपाई’ नेत्याचे नाव निश्चित

मुंबई –  राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चा सुरू होत्या. कॉंग्रेसमधून भाजपमध्ये येत असलेले विखे-पाटील, विजयसिंह मोहिते-पाटील, अब्दुल सत्तार हे मंत्रिमंडळ विस्तारात पद मिळण्याबाबत आशावादी आहेत, मात्र आता दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी हिरवा कंदील दाखवला असून रविवारी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रविवारी सकाळी ११ वाजता राजभवन येथे होणार आहे. यामध्ये भाजपा, शिवसेनेच्या मंत्र्यांसोबत रिपब्लिकन पक्षाचे सरचिटणीस अविनाश महातेकर हे देखील मंत्रिपदाची शपथ घेतील अशी माहिती रामदास आठवले यांनी दिली आहे. रिपब्लिकन पक्षातर्फे महातेकर यांचे नाव अधिकृतरित्या मुख्यमंत्र्यांकडे पाठविले असल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे. या शपथविधी सोहळ्यात रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. महायुती सरकार मध्ये रिपब्लिकन पक्षाला सत्तेचा वाटा देण्यात येईल आणि मंत्रीमंडळात एक मंत्रिपद देण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण करीत असल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे  रामदास आठवले यांनी आभार मानले आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)