मुंबई: शिवाजी पार्क येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शपथविधी सोहळ्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. सार्वजनिक कारणास्तव असे कार्यक्रम आयोजित करण्याची नियमित प्रक्रिया नसावी अशी उच्च न्यायालयाने सुरक्षेसंदर्भात चिंता व्यक्त केली. न्यायमूर्ती एस.सी. धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती आर.आय. चगला यांच्या खंडपीठाने असे म्हटले आहे की, अशा कार्यक्रमासाठी प्रत्येकजण मैदान वापरायला लागेल. ठाकरे गुरुवारी संध्याकाळी दादरच्या शिवाजी पार्क येथे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील.
‘विक्रम ट्रस्ट’ या स्वयंसेवी संस्थेच्या याचिकेवर न्यायालय सुनावणी होत असताना. शिवाजी पार्क हे खेळाचे मैदान आहे की करमणुकीचे ठिकाण आहे ? असा प्रश्न उपस्थित झाला होता. यावर कोर्टाने म्हटले आहे की, उद्याच्या कार्यक्रमाबद्दल आम्हाला काही बोलायचे नाहीये. काहीही अनुचित प्रकार घडू नये, अशी आम्ही प्रार्थना करत आहोत. खरंतर हे कार्यक्रम आयोजन एक परंपरा बनेल आणि मग अशा कार्यक्रमांसाठी प्रत्येकजण मैदान वापरेल, अशी चिंता कोर्टाने व्यक्त केली आहे. याच संस्थेच्या जनहित याचिकेवर 2010 मध्ये उच्च न्यायालयाने हा परिसर ‘सायलेन्स झोन’ म्हणून घोषित करण्यात आला होता.