मुंबई – मुंबईत क्रूझवर चाललेल्या ड्रग्ज पार्टीतून अटक केलेल्या अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्यासह आठ जणांना अठक करण्यात आली आहे. निव्वळ अती लाड केल्याने ही मुलं ड्रग्जपर्यंत पोहोचली, असा मतप्रवाह आहे. मात्र अजुनही या मुलांच्या आई-वडिलांचं त्याच्याविषयची प्रेम कमी झालं नाही. याचा प्रत्येय एनसीबीच्या कार्यालयात आला आहे.
मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवरील ड्रग्ज पार्टीवर एनसीबीची धाड पडल्यानंतर बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह (Aryan Khan) आठ तरुणांना अटक झाली आहे. मात्र या आरोपींच्या कुटुंबीयांकडून पोरांचे लाडकोड अजूनही सुरु असल्याचं दिसत आहे.
क्रुझवर अटक केलेल्या एका मुलाची आई एनसीबी ऑफिसबाहेर पोहोचली. या मायमाऊलीने आरोपी मुलासाठी मॅकडॉनल्डचा बर्गर घेऊन गेल्याचं पाहायला मिळालं. तर काही मुलांच्या नातेवाईकांनी त्यांच्यासाठी जेवण आणि कपडे आणले आहेत. यापैकी बर्गर घेऊन पोहोचलेल्या आईला पोलिसांनी मुलाला बर्गर देण्यापासून अडवलं.
आर्यन खान, अरबाज सेठ मर्चंट, मुनमुन धामेचा, नुपूर सतीजा, इस्मित सिंग चड्ढा, मोहक जैस्वाल, गोमीत चोप्रा आणि विक्रांत छोकर या 8 जणांना एनसीबीने अटक केलेली आहे.