माही सांगणार लष्कराची यशोगाथा

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी लवकरच टीव्ही मालिकेत झळकणार आहे. मालिकेद्वारे लष्करी अधिकाऱ्यांच्या यशोगाथा प्रेक्षकांसमोर आणणार आहे. एका प्रॉडक्‍शन कंपनी धोनीबरोबर एका मालिकेची निर्मित करणार आहे.

धोनी भारतीय लष्कराच्या पॅराशूट रेजिमेंटमध्ये लेफ्टनंट कर्नल (मानद) पदावर कार्यरत आहे. या मालिकेतून परमवीरचक्र व अशोकचक्र विजेत्या पराक्रमी जवानांच्या शौर्यगाथा सांगणार आहे. पुढील वर्षीपासून ही मालिका टीव्हीवर दिसेल, असं बोललं जात आहे.

विश्वकरंडक स्पर्धेतील उपांत्य सामन्यात न्यूझीलंडकडून झालेल्या पराभवानंतर धोनी आंतरराष्ट्रीय सामन्यात सहभागी झालेला नाही. तो पुनरागमन कधी करणार याबाबत जानेवारीनंतर विचारा असे धोनीने स्पष्ट केले होते. विश्वकरंडक स्पर्धेनंतर धोनीने लष्करी जवानांसोबत प्रशिक्षणही घेतले होते तसेच हे जवान जसे दिवसभर प्रशिक्षण करतात तेच धोनीने केले होते.

जवानांचे आयुष्य व दिनक्रम अनुभवला आहे. हेच अनुभव, त्यांचे पराक्रम तो आता सर्वसामान्यांशी शेअर करणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.