पिंपरी-चिंचवडच्या महापौरांचा हवेत गोळीबार?

जलपूजनानंतर पवना धरणावर ‘फायरिंग’ केल्याची चर्चा

पिंपरी – जलपूजनानंतर पिंपरी-चिंचवडचे महापौर राहुल जाधव यांनी आज (बुधवारी) पवना धरणावर पिस्तूलातून दोन राउंड फायर केल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

महापौर राहुल जाधव, विरोधी पक्षनेते नाना काटे, मनसेचे गटनेते सचिन चिखले यांनी आज पवना धरणावर जात जलपूजन केले. त्यानंतर सामिष भोजनाचा आस्वाद घेतल्यावर महापौरांनी नवे कोरे पिस्तूल बाहेर काढले. या पिस्तुलाची माहिती कार्यकर्ते, अधिकार्‍यांना सांगितली, तसेच त्यांनी अती उत्साहाच्या भरात हवेत दोन राउंड फायर केले. त्यामुळे हास्यविनोदात रंगलेल्या उपस्थितांची भंबेरी उडाली.

दरम्यान, याबाबत महापौर राहुल जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपण केवळ पिस्तूल हाताळली. परंतु, राउंड फायर केले नसल्याचा दावा केला. चार महिन्यांपूर्वीच स्वसंरक्षणासाठी आपण ही पिस्तूल घेतली. मात्र, आपण ती सोबत बाळगत देखील नसल्याची पुष्टीही त्यांनी जोडली.

Leave A Reply

Your email address will not be published.