जलसंधारण, वने, पशुसंवर्धन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे
रेडा-इंदापूर तालुक्यातील स्वतःला मोठे म्हणून घेणारे नेते मला सोडून गेले. मात्र मला सामान्य जनतेने दिलेले पाठबळ राज्यमंत्री पदापर्यंत जाण्यासाठी उपयुक्त ठरले. त्यामुळे सामान्य जनतेची नाळ काहीही झाले तरी देखील तुटू देणार नाही, अशी ग्वाही जलसंधारण, वने, पशुसंवर्धन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
इंदापूर येथे शहर सकल हराळे वैष्णव समाज तसेच श्री संत रोहिदास मित्र मंडळाच्या श्री संतशिरोमणी रोहिदास महाराज जयंती उत्सवाचा समारोप मंत्री भरणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी जयंती समितीच्या वतीने माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे यांच्या हस्ते राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष नीलकंठ मोहिते, सचिव सागर शिंदे, जिल्हा संपर्कप्रमुख महेश स्वामी, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख सोमनाथ ढोले व सर्व कार्यकारणी सदस्यांचा तसेच अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संदेश शहा व वेब पोर्टल अध्यक्ष शैलेश काटे यांचा सन्मान करण्यात आला.
तत्पुर्वी संत रोहिदास महाराज जन्मोत्सव किर्तनातून किर्तन केसरी सागर बोराटे महाराज यांनी कळी खुडू नका,लेक वाचवा व शिकवा असा संदेश दिला. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर, तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील, माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे, इंदापूर रोटरी क्लबचे अध्यक्ष राकेश गानबोटे, विशाल बोंद्रे, धनंजय बाब्रस, श्रीधर बाब्रस, अनिकेत वाघ, सचिन सपकळ, राजू चौगुले, डॉ. विनोद राजपुरे, पोपट पवार, हरिदास हराळे, सुनील कांबळे, सुरेश सोनवणे, सचिन सोनवणे, अमोल उन्हाळे, धनंजय कांबळे उपस्थित होते.
रोहिदास समाज मंदिरासाठी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या 25 लाख निधीपैकी 15 लाख रुपयांचे काम झाले आहे. तर 10 लाख रुपये तांत्रिक अडचणीमुळे अडकले आहेत. आता उर्वरित सभामंडपाच्या कामासाठी निधी देण्याची मागणी माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे यांनी मंत्री भरणे यांच्याकडे केली. सूत्रसंचालन हरिदास सामसे यांनी केले.