वाराणसी : श्रीलंकेचे पंतप्रधान महिंद्रा राजपक्षे हे पाच दिवसांच्या भारत दौर्यावर आले असून रविवारी वाराणसीला पोहोचले. महिंद्रा राजपक्षे लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन काशी विश्वनाथ मंदिरात पोहचले. त्यानंतर त्यांनी काशी विश्वनाथ मंदिराची पूजा केली.
त्यानंतर राजपक्षे यांनी काळ भैरव मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर राजपक्षे हॉटेल ताजला रवाना झाले. संध्याकाळी राजपक्षे सारनाथ येथे जातील तेथे ते स्तूप आणि पुरातत्व संग्रहालयाला भेट देतील. महाबोधी सोसायटीचे प्रभारी मेधाकर भंते म्हणाले की, राजपक्षे सारनाथ येथे अनुयायांशी चर्चा करतील.