नेपाळमधील नाराज विरोधकांची काढली समजूत
काठमांडू – भारताच्या नवीन संसदेमध्ये लावण्यात आलेले “अखंड भारता’ची प्रतिमा म्हणजे सांस्कृतिक प्रतिमा आहे, ही प्रतिमा म्हणजे राजकीय नकाशा नाही, असे स्पष्टिकरण नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांनी दिले आहे.
नेपाळमधील विरोधकांनी या प्रतिमेचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर प्रचंड यांनी त्यांची समजूत काढण्यासाठी हे स्पष्टीकरण दिले आहे.
विरोधी पक्षाच्या खासदारांनी “अखंड भारत’ नकाशाचा मुद्दा उपस्थित न केल्याबद्दल त्यांची निंदा केली, या नकाशात नेपाळचा भूभागही असल्याचा दावा विरोधकांनी केला. त्यावर प्रचंड यांनी संसदेत हे भाष्य केले. या मुद्द्यावर अधिक अभ्यास व्हायला हवा, असे प्रचंड म्हणाले.
अनेक शेजारील देशांच्या भागांचा समावेश असलेल्या “अखंड भारत’चा नकाशा म्हणून त्याचा अर्थ लावला जात असल्याने नेपाळमध्ये या भित्तीचित्रामुळे वाद निर्माण झाला आहे.