लोणी काळभोर- हवेली तालुक्याच्या विविध भागात करोनाने सलग दुसऱ्या दिवशी धुमाकूळ सुरुच ठेवला आहे. हवेली तालुक्यात शुक्रवारी (दि. 3) बाधित रुग्णांच्या संख्येने दिवसभरात पन्नाशीचा आकडा गाठला आहे. तालुक्यातील ऍक्टिव्ह बाधित रुग्णांची संख्या दोनशे सत्तरवर पोहोचली आहे. दुसरीकडे रुग्ण दुपटीचा वेग अकरा दिवसावरुन नऊ दिवसांवर आला असल्याची माहिती पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात यांनी दिली.
मांजरी बुद्रुक ( 16), नऱ्हे ( 6), देहु ( 3), नांदेड ( 5), न्यू कोपरे ( 3), खानापूर ( 1), लोणी काळभोर ( 4), निरगुडी ( 1), खडकवासला ( 4), किरकिटवाडी ( 1), मांजरी खुर्द ( 2), वडकी ( 2) व उरुळी कांचन ( 2) या तेरा ग्रामपंचायत हद्दीत पन्नास पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. दिवसभऱात सहा रुग्णांना उपचारानंतर घऱी सोडण्यात आले आहे.
घरी सोडलेल्या सहा रुग्णांत थेऊरमधील चार रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात बाधितांपैकी पन्नास टक्क्यांहूनही अधिक रुग्ण केवळ पाच गावांतच 26 रुग्ण आढळून आले आहेत. सलग चौथ्या दिवशी पूर्व हवेली हॉटस्पॉटवर राहिली आहे. सात दिवसांत मांजरी बुद्रुक ( 54), लोणी काळभोर ( 12), कुंजीरवाडी ( 10), कदमवाकवस्ती ( 13), शेवाळवाडी ( 13) व उरुळी कांचन ( 8) या ग्रामपंचायत हद्दीतील बाधित रुग्णसंख्या धाकधूक वाढवणारी आहे.