मुंबई- अलौकिक आवाजाने रसिकांवर मोहिनी घालणारे प्रसिद्ध पार्श्वगायक ‘एस.पी. बालासुब्रमण्यम’ यांचे काल (दि. 25) प्राणज्योत मालवली. चैन्नईतील एमजीएम हेल्थकेअर या रुग्णालयात बालासुब्रमण्यम यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर बालासुब्रमण्यम यांचे पार्थिव त्यांच्या फार्महाऊसवर अंतिम दर्शनासाठी आणण्यात आले. आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
View this post on Instagram
मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी ‘एस.पी. बालासुब्रमण्यम यांना तामिळनाडू पोलिसांकडून 24 बंदुकांची सलामी देण्यात आली. त्यांचे कुटुंबिय आणि संबंधित व्यक्ती उपस्थित होते. तसेच सिनेसृष्टीतील अनेक दिग्ज कलाकार देखील यावेळी उपस्थित होते.
View this post on Instagram
#Udhaynidhistalin at SPB Home to pay homage 💔 @instamamey #Spbalasubramaniam
आवाजाचा जादूगार असलेले एस. पी. बालसुब्रमण्यम यांनी आजवर तेलगू, तामिळ, कन्नड, हिंदी, मल्याळम अश्या अनेक भाषांमध्ये जवळपास 40,000 गाण्यांना आपला आवाज दिला आहे.