मुंबई – सुहाना खान आणि खुशी कपूरचा डेब्यू चित्रपट ‘द आर्चीज’ ची चाहत्यांना खूप दिवसांपासून प्रतीक्षा होती. आता ‘द आर्चीज’ चा टीझर रिलीज झाला आहे. सुहाना आणि खुशी व्यतिरिक्त अगस्त्य नंदा देखील झोया अख्तरच्या या चित्रपटातून डेब्यू करत आहे. ब्राझीलमध्ये नेटफ्लिक्सच्या तुडुम इवेंटमध्ये या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. झोया अख्तरचा हा चित्रपट प्रसिद्ध ‘आर्चीज कॉमिक्स’मधून घेण्यात आला आहे.
आर्चीजचा टीझर एक मिनिटाचा आहे, जो रिव्हरडेल नावाच्या हिल स्टेशनपासून सुरू होतो. ट्रेन स्टेशनवर येते. पुढच्या दृश्यात काही विंटेज आणि रेट्रो कार दिसत आहेत. त्यात अगस्त्य नंदा गिटार वाजवताना दिसत आहेत, तर सुहाना खान आणि खुशी कपूर डान्स करताना दिसत आहेत. चित्रपटाची कथा 1964 मधील आहे, त्यामुळे संपूर्ण रेट्रो फील देण्यात आला आहे.
टीझरमध्ये पॉप टेट नावाचे दुकान देखील आहे, जेथे आर्चीज आणि त्याचे मित्र बराच वेळ घालवतात. हा टीझर पाहून तुम्हाला आर्चीज कॉमिक्स आणि त्याचा काळ नक्कीच आठवेल. टीझरमध्ये मित्रांचा धमाल आणि डान्स तसेच दुःखाचे क्षण आहेत. ‘द आर्चीज’च्या टीझरला चाहत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. चाहत्यांचे म्हणणे आहे की ते त्यांना 90 च्या दशकात परत घेऊन गेले आणि जुन्या आठवणी परत आणल्या.
आर्चीज नेटफ्लिक्सवर स्ट्रीम केले जाईल. मात्र, त्याची अधिकृत तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. या चित्रपटात वेदांग रैना, मिहिर आहुजा, डॉट आणि युवराज मेंडा देखील दिसणार आहेत.