अखेर प्रतीक्षा संपली… ‘या’ दिवशी रिलीज होणार बहुप्रतीक्षित “83′ सिनेमा

मुंबई – थिएटर इतके दिवस बंद होते म्हणून अनेक सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाले आहेत. मात्र आता थिएटर खुली होण्याची घोषणा झाल्याबरोबर लगेचच एकापाठोपाठ एक सिनेमे रिलीज होण्याची घोषणा व्हायला लागली आहे. 

या लिस्टमध्ये सर्वात पहिली घोषणा “सूर्यवंशी’ची झाली. त्यापाठोपाठ रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोणच्या “83’ची आहे. यावर्षी ख्रिसमसच्या मुहूर्तावर “83′ रिलीज होणार आहे. रणवीर सिंहने स्वतःच ही बातमी आपल्या फॅन्सबरोबर शेअर केली आहे. “हीच वेळ आहे. “83′ या ख्रिसमसला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. 

हिंदीबरोबर तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळममध्ये रिलीज होणार आहे.’ असे त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. यापूर्वी अन्य सिनेमांच्याबरोबर “83’ची रिलीज डेट तीनवेळा पुढे ढकलली गेली आहे. सिनेमा गेल्यावर्षी ऑगस्टमध्येच तयार झाला आहे. 

पण लॉकडाऊनमुळे गेल्यावर्षी ख्रिसमसमध्ये रिलीज करण्याचे नियोजन रद्द करायला लागले होते. त्यानंतर यावर्षी एप्रिलमध्ये अक्षय कुमारच्या “सूर्यवंशी’बरोबर “83′ रिलीज होणार होता. ही तारीख बदलून नंतर 4 जून करण्यात आली होती. पण तेव्हाही करोनाची साथ आटोक्‍यात आलेला नव्हती. म्हणून थिएटर उघडेपर्यंत वाट बघण्याचे ठरले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.