कापूरहोळ : भोर तालक्यात बिबट्यांची संख्या दिसेंदिवस वाढत आहे. गावागावांत बिबट्याचा वावर नागरिकांना पाहायला मिळतो आहे. करंदी खे. बा.(ता. भोर) गावच्या शिवारात बिबट्याचे नुकतेच दर्शन झाल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.
गावच्या रहिवाशी परिसरातबिबट्याने मानव वस्तीमध्ये प्रवेश केल्याने ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी (दि. 9) सायंकाळी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मागील बाजूस जिल्हा परिषद रस्त्याच्या ठिकाणी बिबट्याचे दर्शन झाल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.
याबाबत तातडीने नसरापूर वनविभाग कळविण्यात असून, तेथे वन कर्मचाऱ्यांनी भेट देऊन माहिती घेत नागरिकांना सतर्क राहण्यासाठी सूचित केले. याबाबत नागरिकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून, गावात नागरिकांवर आणि पाळीव प्राण्यांच्यावर बिबट्याने हल्ले करण्यापूर्वी वनविभागाने सापळा लावून त्याला पकडणे गरजेचे आहे.