पिंपरी (पुणे) – धर्मांतरावर आधारित “दि केरला स्टोरी’ या चित्रपटाचे पिंपरी-चिंचवडमध्ये तीन शो मोफत दाखवण्यात येणार आहेत. यासाठी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला आहे. चिंचवडमधील सिटी वन मॉलमधील पी.व्ही.आर. सिनेमागृहात गुरूवारी (दि. 11) “दि केरला स्टोरी’ चित्रपटाचे मोफत शोचे नियोजन केले आहे.
“द केरळ स्टोरी’ हा चित्रपट 5 मे पासून थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.या चित्रपटात दाखवलेली हृदय पिळवटून टाकणारी कथा प्रेक्षकांच्या चिंतन करायला लावणारी आहे. समाजप्रबोधनाचा भाग म्हणून आमदार लांडगे यांनी या चित्रपटाचे तीन शो मोफत आयोजित केले आहेत.
आमदार महेश लांडगे यांनी सांगितले की, कोणत्या ना कोणत्या कारणामुळे महिलांची फसवणूक केली जाते. तर आळंदीत एक धर्मांतराचा प्रकार आम्ही उधळून लावला होता. आपल्या माता-भगिनी सुरक्षित राहण्यासाठी प्रबोधनात्मक उपक्रम म्हणून आम्ही हा शो मोफत ठेवला आहे.