नवी दिल्ली – मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात मंगळवारी दक्षा नावाच्या मादी चित्त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या आणि मृत्युमुखी पडलेल्या चित्त्यांची संख्या तीनवर पोहचली आहे. याआधी 27 मार्च आणि 13 एप्रिलला दोन चित्ते दगावले.
त्यामध्ये प्रत्येकी एका नर आणि मादीचा समावेश होता. कुनो उद्यानात 42 दिवसांत तीन चित्त्यांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे ते उद्यान चित्त्यांच्या अधिवासासाठी अनुकूल आहे की नाही याविषयीच्या चर्चांना आणखी खतपाणी मिळणार आहे. याआधी दोन चित्ते दगावल्यानंतर आफ्रिकन तज्ञांनी भारतातील चित्त्यांच्या प्रकल्पाचा आढावा घेतला. त्या तज्ञांनी काही महत्वाच्या सूचना केल्याचे समजते.