मुंबई- उर्फी जावेद ही तिच्या लूकमुळे कायमच चर्चेत असते. नुकतेच उर्फी जावेद हिने तिच्या अतरंगी लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
उर्फी जावेद हिचे हे फोटो पाहून चाहत्यांना सुद्धा मोठा धक्का बसला आहे. नुकतेच उर्फी जावेद हिचा नवा लूक पाहून अनेकांचे डोके चक्रावले आहेत. उर्फी जावेद हिने यावेळी चक्क च्युईंगमपासून तयार केलेले टाॅप घातला आहे. उर्फी जावेद हिला च्युईंगमच्या टाॅपमध्ये पाहून अनेकांना धक्का बसलाय. आता याचे फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहेत.
दरम्यान, उर्फी या अश्या प्रकारांमुळे कायमच ट्रोल होत असते त्यामुळे आता नेटकऱ्यांनी सुद्धा हि उर्फी काय करेल याचा काही नेम नाही असे म्हणण्यास सुरवात केली आहे.